18th Nov, 2022

लांब सडक आणि मुलायम केस असावेत असे सर्वांनाच वाटते. दाट, आकर्षक दिसणारे केस ही काहींना निसर्गदत्त लाभलेली देणगी असते तर काहींना उपाय-योजना करून ही गोष्ट साध्य करावी लागते. अनेकांच्या मते लांब केसांचे खूप फायदे असतात, जसेकी विविध केशरचना करता येतात, प्रसंग किंवा अवचित्या नुसार लांब केसांना वेगवेगळ्या पद्धतीने बांधता अथवा सोडता येते. कोणत्याही पोषाखावर ते शोभून दिसतात आणि त्यांच्यावर वेगवेगळे प्रयोग देखील करता येतात.
जर तुम्हाला तुमचे केस लांब ठेवायचे असतील, तर येथे दिलेले केस वाढवण्यासाठीचे उपाय करून पहा. केसांच्या वाढीवर ह्या उपाय योजनांचा नक्कीच चांगला परिणाम होईल आणि तुमच्या सुंदर केसांचं नक्कीच कौतुक होईल.
What’s covered in the article?
- केस वाढवण्यासाठीचे रामबाण उपाय (Hair Growth Tips in Marathi)
- Conclusion
केस वाढवण्यासाठीचे रामबाण उपाय (Hair Growth Tips in Marathi)
- केसांची काळजी घ्या. त्यांना तीव्र उन्हापासून आणि उष्णतेपासून सुरक्षित ठेवा.
- केसांवर खूप ताण पडेल, ते ओढले जातील अशा केशरचना करू नका.
- ब्लीच व इतर रासायनिक पदार्थ केसांच्या वाढीसाठी हानीकारक ठरतात. तसेच केस कृत्रिम-रित्या सरळ किंवा कुरळे करण्यासाठी वापरल्या जाणार्या आयुधांमुळे, किंवा केसांवर प्रक्रिया करण्यासाठी वापरल्या जाणार्या रासायनिक घटकांमुळे, डोक्यावरची त्वचा कोरडी पडते व केस गळतात. ह्यांचा केसांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे केसांच्या चांगल्या वाढीसाठी, ह्या गोष्टी टाळणे हितकारक ठरते.
- अनेकदा केस विंचरण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे देखील केस तुटतात किंवा केसांना इजा होते, जे केसांच्या वाढीस मारक ठरते. हलक्या हाताने केस विंचरल्यास, त्यांचे गळणे/तुटणे कमी होते.
- केसांना तेल लावायचे असेल तर केस धुण्यापूर्वी अर्धा तास तेल लावून लगेच धुणे चांगले. त्यामुळे केसांना कंडिशनिंग इफेक्ट येईल.
- अंड्याचा बलक वापरून केलेला हेयर मास्क केसांच्या कंडिशनिंगसाठी मदत करतो. ह्यामुळे केसांचे तुटणे कमी होते.
- दालचीनी आणि नारळाचे तेल, ह्यांचे मिश्रण केसांवर लावल्यास, त्यांच्या वाढीस मदत होते. रक्तप्रवाह सुधारतो तसेच केसांना काही आवश्यक पोषणतत्वे मिळतात.
- शाम्पूचा अती वापर टाळा. शाम्पूतील काही घटकांमुळे डोक्यावरची त्वचा कोरडी पडू शकते, ज्याची परिणती केस गळण्यामध्ये होते व हे केसांच्या वाढीसाठी मारक ठरते. श्यक्यतो केस धुण्यासाठी मेडिकेटेड शाम्पूचा वापर करा.
- केसांना शांपू केल्यानंतर, कंडिशनर चा वापर करणे आवश्यक आहे. कंडिशनर मुळे केसांमध्ये पोषणतत्वे व आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते.
- केसांची वाढ नीट होण्यासाठी (proper hair growth), तसेच त्यांचा तजेला टिकून राहण्यासाठी, योग्य तो आहार घेणे खूप महत्वाचे आहे. प्रथीने व सर्व जीवनसत्वे ह्यांनी युक्त असा आहार घेतल्यास, केसांची वाढ चांगली होते.
- मानसिक ताणामुळे केस गळणे, टक्कल पडणे, केसांची घनता कमी होणे, डोक्यावरची त्वचा कोरडी पडणे अशा समस्या उद्भवू शकतात. मानसिक ताण-तणाव कमी करणे हे केसांची वाढ उत्तम होण्यास पूरक ठरते.
- पी.आर.पी व नॅनो फॅट (PRP and Nanofat) थेरपी चा केसांच्या वाढीसाठी फायदा होतो. अर्थात, तज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय अशा उपाय योजना करणे योग्य नाही. जर तुम्हाला केस वाढवण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय उपचारांची मदत घ्यायची असेल तर तज्ञाचा सल्ला घ्या आणि त्याच्या मार्गदर्शनाखालीच असा कोणताही उपाय करा.
हे होते केस वाढवण्यासाठीचे काही उत्तम उपाय (fast hair growth tips in Marathi). केसांची योग्य ती निगा राखणे, चांगला आहार घेणे आणि योग्य व्यायाम करणे हे केसांच्या वाढीमधील महत्वाचे घटक आहेत. केसांची व्यवस्थित काळजी घेतल्यास त्यांची वाढ चांगली होते व जलदगतीने होऊ शकते. केस वाढवण्यासाठी उत्तम मार्गदर्शन हवे असेल तर एखाद्या चांगल्या केश व त्वचारोग तज्ञाला भेटा. त्याचा सल्ला तुमच्यासाठी मोलाचा ठरेल. तुम्ही जर उत्तम आणि अनुभवी केश-त्वचारोग तज्ञाच्या शोधात असाल तर HairMD ला आवश्य भेट द्या. तेथील अनुभवी doctors तुम्हाला योग्य तो सल्ला देतील व तुमच्या केसांवरील कोणत्याही समस्येवर उत्तम उपाय सांगतील. तिथे घेतलेल्या उपचारांचा नक्कीच तुमच्या केसांवर चांगला परिणाम होईल, व तुमच्या केसांची वाढ अधिक चांगली होईल व त्यांचे सौंदर्य खुलेल हे नक्की.
Do You Know?
Nearly 250 Patients Visit HairMD
Everyday For Various Hair Concerns?
(Your journey to healthier and fuller hair starts here!)
Meet Our Dermatologists
Conclusion
तुमचे केस लांब, घनदाट आणि सुंदर ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. वर दिलेले उपाय अवलंबविल्यास केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होईल. तसेच, अनुभवी केश-त्वचारोग तज्ञाचा सल्ला घेतल्यास तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. जर तुम्ही केसांच्या समस्या सोडवण्यासाठी तज्ञांच्या मदतीचा विचार करत असाल, तर HairMD ला भेट देणे एक उत्तम पर्याय आहे. तुमच्या केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तेथे आवश्यक उपाय उपलब्ध आहेत.
Further Reading
First-Time IV Drip for Hair Growth? Here’s What to Expect
Considering IV drip for hair growth in Pune? Discover how the treatment works, what to expect in your first session, benefits, and safety insights at HairMD.
IV Vitamin Therapy: Does It Work?
IV vitamin therapy delivers nutrients directly into the bloodstream for skin glow, energy, and immunity. Know benefits, risks, and expert advice in Pune.
IV Drips for Hair Growth: Myth or Miracle?
Hair fall issues? Know whether IV drip therapy can improve hair growth. Get evidence-based treatment plans at HairMD Pune.
Does Glutathione Cause Hair Whitening?
If glutathione can turn hair white or grey? HairMD Pune explains the truth, causes of greying, and safe ways to care for hair and scalp health.
Have thoughts? Please let us know
We are committed not only to treating you, but also educating you.